जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना हे जागतिक महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरलेली आहे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे सोबत तसेच या अभूतपूर्व संकटातून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला या कार्यात झोकून द्यावे असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविताना आपण विशेष भर द्यावा अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्याकरिता आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने जिल्हा व तालुका पातळीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तसंकलन होण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे यानुसार जळगाव राष्ट्रवादी, महानगर व जळगाव महिला व युवती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष कल्पना पाटील , जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील , महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील , महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी , युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील , उत्तर महाराष्ट्र युवती समन्वयक दिव्या भोसले , अमोल कोल्हे, अशोक लाडवंजारी, वाल्मिक पाटील, सुनील माळी, अशोक पाटील , चंद्रकांत चौधरी , दिलीप माहेश्वरी , नईम खाटीक, पलक शर्मा , आरोही नेवे , सिद्धी शिंपी , शिल्पा चौधरी आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/235998914972852