मोनाली कामळस्कर फॉऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिर

जळगाव प्रतिनिधी । शहरात आज (दि. 23) रोजी मोनाली कामळस्कर फॉऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

जळगांव शहरात या करोना महामारीत रक्ताची खूपच टंचाई निर्माण झाली होती. तसेच फौंडेशनचे उपाध्यक्ष विजय नारायण वाणी यांच्या वाढदिवसानिमित्याने  फौंडेशन ने पुढाकार घेऊन आज रोजी रेडक्रॉस सोसायटी जळगांव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या रक्तदान शिबिरात 35 समाज बांधवांनी व मित्र परिवारानी रक्तदान केले. शिबिर चालू असताना रेडक्रॉस चे अध्यक्ष डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी येऊन या करोना महामारीत रक्तदानाचे महत्व समजावून सांगितले. हा कार्येकर्म यशस्वीते साठी नंदकिशोर कामळस्कर, सुधाकर वाणी, विजय वाणी, अनंत कश्यप, राजेश वाणी, राहुल हरणे, वासुदेव वाणी, शंकर वाणी, अजय कामळस्कर तसेच रेडक्रॉस सोसायटी चे कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

शेवटी संस्थेचे संस्थापक नंदकिशोर कामळस्कर यांनी सर्वांचे आभार मानले.

 

Protected Content