जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील एकुलती येथे महाविकास आघाडी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, गोदावरी फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन एस.टी .पाटील जामनेर तालुका अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस मूलचंद नाईक, माजी उपसरपंच पती संजय पाटील, पंकज पाटील उपसरपंच, माधव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरांमध्ये एकूण 26 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. यावेळी गावातील प्रतिष्ठित रामधन पाटील, मुन्ना महाजन, संजय सोनवणे ,रामकृष्ण पाटील, योगेश पाटील, बाविस्कर कृषी केंद्राचे संचालक उद्घाटनाला उपस्थित होते.
रक्तदात्यांमध्ये पंकज पाटील, पंकज कोळी, शशांक पाटील, प्रदीप युवराज पाटील, विजय सोनवणे, पंकज लोनिया, पंकज राऊत, शुभम पाटील, किशन मधुकर पाटील, प्रमोद बापू पाटील, अर्जुन ठाकरे, अशोक बाबुराव पाटील, गणेश कोळी, समाधान पाटील, प्रशांत पाटील ,समाधान कोळी, राजू पाटील, प्रशांत पाटील, अरुण पाटील, गौरव ठाकरे ,भावेश महाजन, सागर पाटील ,कैलास पाटील ,सतीश भावसार ,कृष्णा कोळी ,भूषण सोनवणे या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी रक्तदान करून शासनाला कोरोना काळात बहुमोल असे सहकार्य केले व गोदावरी फाउंडेशन ची सर्व टीम यांचे सहकार्य लाभले. तसेच डॉक्टर नितीन परदेशी उपस्थित होते. सर्व एकुलती येथील नागरिकांचे व रक्तदात्यांचे आभार पंकज पाटील यांनी मानले.