यावल प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण येथील तापी नदीच्या पात्रातून अवैध वाळूची वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार यांनी विशेष गस्त पथकांची नियुक्ती केली आहे. यामुळे वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे की, यावल तालुक्यातील थोरगव्हाण, पथराडे, शिरागड येथुन मोठ्या प्रमाणावर तापी नदीच्या पात्रातुन खुलेआम अवैध मार्गाने वाळुचा उपसा करून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. अवैध वाळुची वाहतुक सुरुच होती उलट पक्षी कार्यवाही करणाऱ्या पथकांवर वाळु माफीयांचे हल्ले देखील झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान चार दिवसापुर्वीच अवैध वाळुची वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी जाणाऱ्या महसुल विभागाचे मनवेल येथील तलाठी स्वप्निल तायडे यांचा अंगावर टँक्टर चालवुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला सुदैवाने ट्रॅक्टर त्यांच्या पायावरून गेल्याने त्यांच्या पायास गंभीर दुखापत करण्यात आली असल्यामुळे अखेर हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी तहसीलदार महेश पवार यांनी तात्काळ या घटनांची दक्षता घेत नाकाबंदी केली असून अवैध वाळू रोखण्यासाठी एक विशेष पथक तयार केले. थोरगव्हाण गावातील मुख्य चौकात वाळुची चोरटी वाहतुक रोखण्यासाठी तलाठी मुकेश तायडे , कोतवाल धनराज महाजन, होमगार्ड कैलास लावणे या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.