जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाला असून यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हयात महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. सर्वांच्या सर्व ११ जागांवर विजय मिळवला आहे. यावर भाजप महिला मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाले की, देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी, देशाचा पर्यायाने आपल्या समाजाचा विकास व्हावा याकरिता महायुती सरकारच महत्त्वपूर्ण आहे, असा विश्वास जनतेच्या मनात होता. लाडक्या बहिणींची रक्षा बंधन व भाऊभीज देवाभाऊंनी गोड केली त्यासाठी बहिणींनी देखील मतदान करून भरभरून आशीर्वाद दिले. आज जे यश भारतीय जनता पक्ष व महायुतीला मिळालेले आहे त्यासाठी जनतेचे मी आभार मानते . हे शासन सदैव तुमच्या पाठीशी राहील.