मुंबई (वृत्तसंस्था) परदेशी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी मुंबईतून एकाला अटक करण्यात आली आहे.
न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय तक्रारदार तरुणीसोबत सोशल मीडियावर राज सिंगची फेब्रुवारी महिन्यात ओळख झाली होती. दोघांममध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर तरुणीकडून जवळीकीचा फायदा घेत राजने तिचे काही खासगी व्हिडीओ आणि फोटो मागवून घेतले. त्यानंतर राजने पैसे पाठवले नाहीस, तर तुझे खासगी व्हिडीओ आणि फोटो तुझ्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना आणि मित्र मंडळींना पाठवेन’ अशी धमकी राजने सप्टेंबर महिन्यात तिला दिली. राजने केलेल्या विश्वासघातामुळे तरुणी चांगलीच हादरली. धमकीला घाबरुन तिने टप्प्याटप्प्यात 10 हजार डॉलर्स म्हणजेच तब्बल सात लाख रुपये राजला पाठवले. त्यानंतर तिने पैसे पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी राजने तरुणीचा एक व्हिडीओ तिच्या मित्राला पाठवला. त्यामुळे राजविरोधात त्या तरुणीने इमेलद्वारे मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी राजला अटक केली आहे.