रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरात भारतीय जनता पक्षाच्या महा सदस्य नोंदणी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विविध ठिकाणी आयोजित या अभियानामध्ये पुरुष आणि महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अमोल जावळे यांनी १५,००० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
आज, ५ जानेवारी रोजी राजे छत्रपती शिवाजी चौक, स्वामी विवेकानंद चौक, अग्रसेन चौक नालाभाग, अंबिका व्यायामशाळा आणि रामबाग मैदान येथे नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, अरुण शिंदे, नितीन पाटील, रवींद्र पाटील, दिलीप पाटील, उमेश महाजन, यशवंत दलाल, मनोज श्रावक, निलेश पाटील, भास्कर बारी, पवन चौधरी, बाळा अमोदकर, प्रशांत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. महा सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून रावेर शहरात भाजपा सदस्यत्व नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला आहे.