यावल येथे भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाला उत्साहात प्रारंभ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या सूचनेनुसार राज्यभरात संघटन पर्व अभियानांतर्गत सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान अत्यंत यशस्वीपणे राबवले जात आहे. जळगाव जिल्हा पूर्वमध्ये मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली तसेच मंत्री रक्षाताई खडसे आणि मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नोंदणी मेगा ड्राइव्हला आज उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. यावल, रावेर, फैजपूर आणि परिसरात आज आमदार मा. अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान राबवले गेले.

“लोकसभा आणि विधानसभेतील निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेने भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणावर मतदान केले. आज या सदस्य नोंदणी अभियानाद्वारे आम्ही त्या जनतेला भाजपाशी अधिक जुडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की, मोठ्या संख्येने नागरिक आज भाजपाशी जोडले जातील. हा एक ऐतिहासिक क्षण आहे, ज्यामुळे देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाला भाजपाच्या विचारधारेशी जोडण्याची संधी मिळेल.” असा प्रतिपादन या प्रसंगी आमदार अमोल जावळे यांनी केले.

या अभियानाद्वारे पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे. सदस्य नोंदणी अभियानामुळे भाजपाच्या धोरणांची अधिक व्यापकपणे चर्चा होईल आणि पक्षाला अधिक कार्यकर्त्यांची ताकद मिळवून देईल. यामुळे भाजपाची विचारधारा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हे आणखी सोपे होईल. या अभियानामुळे नागरिकांमध्ये पक्षाबद्दल अधिक आकर्षण निर्माण होईल आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह दिसून येईल.

संघटन पर्व अभियानाच्या माध्यमातून भाजपाच्या संघटनात्मक कार्याला बळकटी मिळणार आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व उत्साह संचारला जाईल. या अभियानाच्या यशस्वितेने पक्षाच्या आगामी कार्यावर सकारात्मक परिणाम होईल. भाजपाची विचारधारा अधिक लोकांपर्यंत पोहोचवून देशाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करणे हे सर्वसामान्य नागरिकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

Protected Content