गोवा, कर्नाटकनंतर मध्य प्रदेशवर भाजपचा डोळा ; काँग्रेस चिंतेत

325631 bjp congress

भोपाळ (वृत्तसंस्था) कर्नाटक आणि गोव्यानंतर आता मध्य प्रदेशवर भाजपाचा डोळा असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एका मंत्र्याला 4 आमदारांना सांभळण्याची जबाबदारी दिली आहे.

 

2018 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश निवडणुकीत भाजपाला 109 जागा तर काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपातील एका आमदाराला खासदारकीची संधी मिळाल्यामुळे भाजपाची संख्या 108 झाली आहे. सरकार स्थापनेसाठी 116 आमदारांची गरज आहे. काँग्रेस सरकारला 1 समाजवादी पक्ष, 2 बसपा आणि 4 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांकडून सत्ता स्थापनेची स्वप्न पाहिली जात आहे असा दावा काँग्रेसने केला. तर ज्या बसपा आमदाराने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे तो आमदार सध्या नाराज आहे. शुक्रवारी विधानसभेत बसपा आमदार रामबाई यांनी त्यांच्या कुटुंबाला एक प्रकरणात गोवले जात आहे असा आरोप केला. त्यामुळे आगामी काळात गोवा, कर्नाटकसारखं मध्य प्रदेशातही राजकीय संकट उभं राहील,अशी चर्चा आहे.

Protected Content