एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप युती पक्षाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळालेले डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या प्रचार कॉर्नर सभांना नागरिकांकडून मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निवडणुकीच्या प्रचाराने आता शहरात वेग घेतला आहे.

याच अनुषंगाने, एरंडोल शहरातील कुंभारवाडा परिसरात नुकतीच डॉ. ठाकूर यांची कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. येथील नागरिकांनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. ठाकूर यांच्या उमेदवारीला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. यावेळी डॉ. ठाकूर यांनी एरंडोलकरांना भावनिक साद घालत, ‘वेळप्रसंगी मी एरंडोलच्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील,’ अशी ग्वाही दिली.

नागरिकांनी व्यक्त केले मदतीचे अनुभव
विशेष म्हणजे, सभेत उपस्थित असलेल्या काही नागरिक आणि तरुणांनी यापूर्वी डॉ. ठाकूर यांनी केलेल्या मदतीचे वैयक्तिक अनुभव व्यक्त केले. यामुळे नागरिकांमध्ये डॉ. ठाकूर यांच्याविषयी असलेल्या विश्वासार्हतेची आणि सहानुभूतीची कल्पना आली. त्यांच्या या मदतीच्या भूमिकेमुळे मतदारांचा पाठिंबा अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्यासह यावेळी परिसरातील भाजपचे नगरसेवक पदासाठी असलेले इतर उमेदवारही उपस्थित होते. डॉ. ठाकूर यांनी उपस्थित नागरिकांना आश्वासन दिले की, निवडून आल्यास एरंडोल शहराचा विकास चांगल्या प्रकारे केला जाईल आणि शहराच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील. कॉर्नर सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता, भाजप युतीचा प्रचार जोमाने सुरू असल्याचे दिसत आहे.



