Home Cities मुक्ताईनगर भाजपच्या प्रचार कार्यालयाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन !

भाजपच्या प्रचार कार्यालयाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन !

0
122

मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृतपणे सुरुवात केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज भाजपच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि उपस्थिती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी, खासदार रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे आणि अशोक कांडेलकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आणि शहराचा विकास साधण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, विभागीय निवडणूक प्रमुख नंदू भाऊ महाजन, डॉ. केतकीताई पाटील, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भावना महाजन आणि माजी नगराध्यक्ष नजमा तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीतील युती न होण्यामागचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, “मुक्ताईनगरमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्हाला शिवसेनेकडून नऊ जागांसाठी युतीचा प्रस्ताव आला होता.” परंतु, स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद आणि एकूण परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर, खा. रक्षाताई खडसे यांनी ही निवडणूक भाजप स्वबळावर सहज जिंकू शकते, असा विश्वास व्यक्त केला. महाजन यांनी पुढे सांगितले, “स्थानिक परिस्थिती बघता आम्ही युतीचा प्रस्ताव नाकारला आणि स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.” मंत्री महाजन यांच्या या स्पष्टीकरणामुळे मुक्ताईनगरच्या राजकारणातील युतीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. भाजप येथे नगराध्यक्षपदासह सर्व जागा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावत असल्याचे या वेळी स्पष्ट झाले.


Protected Content

Play sound