Home राजकीय रावेर नगर पालिकेत भाजपाची मोठी परीक्षा : नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत कशी काढणार?

रावेर नगर पालिकेत भाजपाची मोठी परीक्षा : नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत कशी काढणार?

0
206

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर नगर पालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. भाजपा पक्षाने नगरध्यक्ष पदासाठी संगिता भास्कर महाजन यांच्यासह सर्व प्रभागांतील नगरसेवक उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी, या घोषणेनंतर पक्षांतर्गत नाराजी
पक्ष कसे शांत करणार आणि संघटन एकसंध ठेवेल हेच भाजपाच्या स्थानिक नेतृत्वापुढील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.

भाजपाने माळी समाजाचे सामाजिक गणित साधत नगरध्यक्षपद दिल्याने मराठा मते भाजपाकडे झुकवण्यासाठी काय रणनीती आखली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.भाजपाने तसेच आ.अमोल जावळे यांच्या सल्ल्याने घेतलेल्या या निर्णयामुळे आता मराठा मतदार भाजपा कितपत एकवटू शकतील,याची रणनीती पक्ष कशा प्रकारे आखतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, रावेर नगर पालिकेसाठी आजपासून माघारीची प्रक्रिया सुरू झाली असून काही प्रभागांत भाजपाकडून इच्छुक राहिलेले अनेक उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात आहेत. प्रभाग क्र. २ मधील आशा चैतन्य महाजन, प्रभाग ५ मधील हेमलता अजिंक्य वाणी, प्रभाग ११ मधील रविंद्र दिनकर पाटील, हरीश वासुदेव जगताप, सुनिल सोपान महाजन आणि प्रभाग १२ मधील जनाबाई गोंडू महाजन यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र तिकीट न मिळाल्याने हे सर्व आता अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे हे उमेदवार मागे घेण्यासाठी भाजपा कोणती रणनीती करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तिकीट कपातीमुळे काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. प्रभाग १ मधील ई. जे. महाजन आणि प्रभाग ११ मधील कट्टर कार्यकर्ते संतोष चौधरी (टोपीवाले) यांनी शहराचा बाहेरील रणनीतीकार लोकांच्या दबावाखाली आपली नावे बाजूला करण्यात आल्याचा आरोप केला आहे. “मतदार शहरातील असून स्थानिकांचा आवाज प्राधान्याने ऐकला पाहिजे,” अशी भावना पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनीही व्यक्त केली आहे.रविंद्र महाजन यांनी देखील आपली नाराजी जाहीरपणे मांडली आहे.

सुमारे ३० वर्षांनंतर भाजपा रावेर नगर पालिका निवडणूक पक्षाच्या अधिकृत चिन्हावर लढवत आहे. नगरध्यक्ष पदासाठी सुरुवातीपासून डॉ. योगिता पाटील आणि संगीता महाजन यांच्या नावांत स्पर्धा होती. त्यापैकी महाजन यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र आता उमेदवारी न मिळाल्याने नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समजूत कशी काढली जाणार? भाजपा डॅमेज कंट्रोलमध्ये कितपत यशस्वी ठरणार? हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.रावेरच्या राजकारणात वाढलेल्या तापमानामुळे संपूर्ण शहराचे लक्ष आता भाजपाच्या पुढील पावलांकडे लागले आहे.डॉ संदीप पाटील यांच्या मागे मराठा समाजाची मोठी वोट बँक असून भाजपा त्यांचा उपयोग कश्या पद्धतीने करेल याकडे देखील माध्यमान सहीत जनतेच लक्ष लागले आहेत.


Protected Content

Play sound