भुसावळ प्रतिनिधी | राज्यातील देवस्थाने उघडण्यात यावीत या मागणीसाठी येथील भारतीय जनता पक्षातर्फे आज घंटानाद आंदोलन करण्यात आले.
आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली अष्टभुजा देवी मंदिरासमोर आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी अजय भोळे, युवराज लोणारी, परिक्षीत बर्हाटे, राजेंद्र नाटकर,गिरीश महाजन, राजेंद्र आवटे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलकांनी घंटानाद आणि शंखनाद करून राज्य सरकारचा निषेध केला. राज्यात सर्व काही सुरू असतांना देवस्थाने देखील सुरू करण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली.