पाचोरा नंदू शेलकर । शहरातील जारगांव चौफुलीवर आज शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता भाजपाचे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ओबीसी आरक्षणासंदर्भात सदरचे आंदोलन छेडण्यात आले होते. सुमारे २५ मिनिटे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूकीचा खोळंबा झाला होता.
सदरच्या आंदोलनात जि.प.सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, कृउबाचे माजी सभापती सतिष शिंदे, शहराध्यक्ष रमेश वाणी, भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष कांतीलाल जैन, तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, ओबीसी तालुकाध्यक्ष गोविंद पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष समाधान मुळे, सरचिटणीस दिपक माने, राजेश संचेती, जगदिश पाटील, उपाध्यक्ष हेमंत चव्हाण, महेंद्र मिस्तरी, हिम्मतसिंग निकुंभ, युवा मोर्च्याचे उपाध्यक्ष लकी पाटील, सैनिक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भरत पाटील, नगरदेवळा शहराध्यक्ष नामदेव पाटील, संजय पाटील, योगेश ठाकुर, रोहीत पाटील सह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलना प्रसंगी पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, दत्तात्रय नलावडे, विकास पाटील, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील, योगेश पाटील, नितीन सुर्यवंशी, सुनिल पाटील, सचिन पाटील, अमृत पाटील, मनोज माळी, विश्वास देशमुख, निलेश गायकवाड, ट्राफीकचे ए. एस. आय. प्रकाश पाटील, सुनिल पाटील, ट्राफीक काॅन्स्टेबल बापु महाजन, नंदकुमार जगताप, विजय पाटील, नगर पालिकेचे कर्मचारी अनिल वाघ, प्रशांत कंडारे, प्रकाश लहासे सह होमगार्डच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.