भुसावळ, प्रतिनिधी । उठ ओबीसी जागा हो एकजुटीचा धागा हो ओबीसी के सन्मान में भाजपा मैदान में अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
महा विकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणाचा विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे यावल रोड येथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी अजय नागरणी, परीक्षित बऱ्हाटे, अमोल महाजन, दिलीप कोळी, नगरसेवक गिरीश महाजन, सतीश सपकाळे, खुशाल जोशी, प्रवीण इखनकर, राजेंद्र आवटे, राजेंद्र नेरकर, जयंती सुराणा आदी उपस्थित होते.
या आदोलनाप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे यांनी सांगिले की, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विधान भवनात ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बाजू मांडत असतांना स्पीकर भास्कर जाधव यांनी त्यांना इशारा करून खाली बसायला सांगिलते. याचा भाजपाचे १२ आमदारांनी जाब विचारला असता त्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. ओबीसींच्या आरक्षणासाठी केवळ भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थाने लढत असून शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस हे ओबीसींचा आरक्षणाचा राजकीय गळा घोटण्याचे काम करती असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे यांनी आंदोलना दरम्यान केला. राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असतांना तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मंत्रालय स्थापन करून ओबीसींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.