यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक संपन्न झाली. यात भाजपा युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
बुधवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी शहरातील यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात दुपारी रोजी भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक घेण्यात आली. यात भाजपा युवा मोर्चाची कार्याकारिणी जाहीर करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन होते. याप्रसंगी सोशल मीडिया राज्य संयोजक अमित साळुंखे, जिल्हा सरचिटणीस राकेश फेकडे, कृषीभूषण नारायण चौधरी, भाजपा तालुका अध्यक्ष राकेश फेगडे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती हर्षल पाटील, डॉ.कुंदन बेगडे, सरचिटणीस विलास चौधरी, उज्जेनसिंग राजपूत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, सरचिटणीस व्यंकटेश बारी, योगेश खेवलकर, शहराध्यक्ष रितेश बारी, शरद तायडे, जय चौधरी, कुणाल कोल्हे, नितीन सपकाळे, सोहम कोळपे आदी उपस्थित होते.
नवीन तालुका कार्यकारिणीत भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी अजय वारके, किरण सावळे, राहुल पाटील, निलेश पाटील, वैभव सावकारे, प्रशांत सरोदे, सतीश नेहेते, प्रतिक वारके, जगदीश सोनवणे, तालुका चिटणीसपदी सचिन चौधरी, प्रकाश होळी, ईश्वर सपकाळे ललित महाजन मनोज पाटील दिनेश महाजन, कोषाध्यक्ष म्हणून मयुर पाटील, सोशल मीडिया तालुका प्रमुख हर्षल सोनवणे, पंकज दिलीप मोरे, सोशल मीडिया सहसंयोजक सतीश कोळी यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व निवड झालेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्याहस्ते नियुक्तीपत्र वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर कोळी केले. सूत्रसंचालन योगेश हिवरकर यांनी तर आभार सोहम कोळंबे यांनी मानले.