Home Cities जामनेर जामनेर येथील भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जामनेर येथील भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
29

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गारखेडा आणि नागन चौकी येथील कार्यकर्त्यांनी संजय गरुड भटक्या जाती जमाती व्हीजेएनटीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत केला आहे.

जामनेर तालुक्यातील गारखेडा व नागरी चौक येथील भाजपा कार्यकर्ते चरण बेलदार, किसन जाधव, गोपाल राठोड, गणेश राठोड या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी सगळ्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांना गावांमधील विकास कामे सोडवण्यासाठी मदत केली जाईल, असे आश्वासन यावेळी संजय गरुड यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या जाती जमाती व्हीजेएनटी सेल जिल्हा अध्यक्ष अरविंद चितोडिया, पंडित नाईक, नटवर चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound