Home राजकीय रावेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष

रावेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यभरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या निकालांचा आनंद रावेर शहरातही उत्साहात साजरा करण्यात आला असून, भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत विजयाचा जल्लोष केला. पक्षाच्या या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, आगामी काळातही विकासाच्या राजकारणाला बळ मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

रावेर येथील आमदार अमोल जावळे यांच्या कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्ष संगीता महाजन यांच्या हस्ते फटाके फोडून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. महानगरपालिका निवडणुकांमधील यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे आणि राज्यातील भाजप सरकारच्या कार्याचे फलित असल्याचे मत यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, पंचायत समितीचे माजी उपसभापती पी. के. महाजन, सी. एस. पाटील, भास्कर महाजन, वासुदेव नरवाडे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. तसेच नगरसेवक व पालिका गटनेते अमोल पाटील, दिलीप पाटील, राजेश शिंदे यांनीही जल्लोषात सहभाग घेतला.

भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत पाटील, भाजप जिल्हा सदस्य नितीन पाटील, मनोज श्रावक, शेख मेहमूद, प्रवीण पासपोहे, निलेश पाटील, संदीप पाटील, चंद्रकांत वैदकर, हेमराज लासूरे, निलेश बारी, भूषण चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. फटाके, घोषणाबाजी आणि जल्लोषामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

भाजपला मिळालेले हे यश म्हणजे विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख प्रशासनाला मिळालेली पावती असल्याचे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजप अधिक मजबूतपणे पुढे येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Protected Content

Play sound