बीडमध्ये निवडणुकीअगोदरच भाजपची माघार

maharashtra bjp leader pankaja munde file pic 1575197466

 

बीड (वृत्तसंस्था) शिवसेनेने पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीअगोदरच भाजपने बीडमध्ये माघार घेतली आहे. लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहेत, असे ट्वीट करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पराभव मान्य केला आहे.

 

भूमिका जाहीर करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून निवडणुकीत उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज फक्त मतदान पार पडणार आहे. पण हायकोर्टाच्या आदेशामुळे निकाल १३ जानेवारीपर्यंत राखून ठेवला जाणार आहे. दरम्यान, बीड जिल्हा परिषदेतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची औरंगाबाद येथे शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्या शिवकन्या सिरसाठ यांचे नाव अध्यक्षपदासाठी तर नागरगावचे जिल्हा परिषद सदस्य जयसिंह सोळंके यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले आहे.

Protected Content