मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाने निकालानंतर २४ तासांत जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करायला हवा होता. पण भाजपाने सत्ता स्थापन करायला ऐवढा वेळ का लावला माहित नाही. भाजपने सत्तास्थापनेच्या संधीचा लाभ घ्यायला हवा. सत्ता स्थापनेसाठी भाजपाला आमच्याकडून शुभेच्छा, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
तेराव्या विधानसभेची मुदत शनिवारी संपुष्टात आली आहे. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकार स्थापण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेचे संजय राऊत यांनी स्वागत करत राज्यातील अस्थिरता संपावी हीच आमची भूमिका असल्याचे म्हटले आहे. परंतू यावेळी देखील शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा उद्धव ठाकरे यांच्याइतका चाणाक्ष नेता राज्यात नाही. असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.