भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । झारखंड राज्याच्या भाजपा सोशल मीडिया प्रभारी लकीसिंह राजपूत या भाजपाच्या संघटनात्मक नारी शक्तिवंदन अभियाना अंतर्गत दोन दिवसीय जळगाव जिल्हा पूर्वच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी जामनेर येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेवून स्वागत केले. त्यानंतर भुसावळ येथील भाजपा कार्यालयात भेट घेवून उपस्थित कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
या दौऱ्यापुर्वीती त्यांनी भाजापाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, आ. संजय सावकारे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच रावेर लोकसभा खा. रक्षा खडसे यांची कोथळी येथे सदिच्छा भेट घेतली.
लकी सिंह राजपूत यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देत मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. या संपूर्ण दौऱ्यात त्यांनी यावल, रावेर, मोरगाव, फैजपूर, बोडवड, कुऱ्हाकाकोडा, मुक्ताईनगर, जामनेर, भुसावळ येथे भेट दिल्या. या भेटीत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यां सोबत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थी, महिला बचत गट तसेच नवमतदरांच्या भेटीगाठी, जनसंघा पासुन कार्यरत कार्यकर्त्यांच्या भेट घेत संवाद साधला. विविध बूथ वर जाऊन दिवार लेखनात सहभाग घेऊन फिरसे मोदी सरकारचे भित्ती लेखन केले. भाजपा महिला मोर्चा सोशल मीडिया संयोजक तथा झारखंड प्रभारी श्रीमती लकी सिंह यांनी फैजपूर (यावल) येथील निष्कलंकधाम येथे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेत तेथील धार्मिक व सामाजिक कार्याबद्दल माहिती जाणून घेतली. तसेच मुक्ताई मंदिरात मुक्ताईचे व शिरसाळा येथे जागृत हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन मंदिर विश्वस्त मंडळाशी चर्चा केली.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमती लकी सिंह राजपूत यांनी मोदी सरकारच्या विविध योजनां बद्दल माहिती देत गेल्या ९ वर्षांत देशाच्या करोडो माता भगिनींसाठी केलेल्या कामाच्या बळावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच जळगांव पूर्व जिल्ह्याच्या दौऱ्यात समाजातील विविध घटकांची केलेल्या संवादातून रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाचा उमेदवार पुन्हा विजयी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भुसावळ येथे आयोजित पत्रकार परिषदेस भाजपा महिला मोर्चा सोशल मीडिया संयोजक तथा झारखंड प्रभारी श्रीमती लकीसिंह राजपूत यांच्यासह भाजपा महीला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष केतकी पाटील, जिल्हाध्यक्षा रंजना पाटील, रजनी सावकारे, जिल्हा सरचिटणीस वैशाली कुळकर्णी, सह संयोजिका रेखा बोंडे, नजमा तडवी, सोशल मीडिया संयोजिका सरला कवडीवाले, माजी नगरसेविका दिपाली बऱ्हाटे, मनीषा पाटील, प्रिती पाटील, सोनल महाजन,कविता ठाकूर, रंजना परदेसी आदी उपस्थित होत्या.