मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणूक भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढेल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा किती अपमान केला याची आपल्याकडे यादीच असून त्यांच्या राजकारणाला तोडीस तोड उत्तर देऊ, असेही त्यांनी म्हटले आहे
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विधानसभा निवडणूक संयोजकपदाची जबाबदारी दिली आहे.
आता निवडणुकीसाठी भाजपाचे राज्याचे संयोजक म्हणून संपूर्ण जबाबदारी रावसाहेब दानवे पाहणार आहेत. आमच्या कोअर कमिटीच्या सदस्यांकडेही वेगवेगळ्या समितीची जबाबदारी देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूक आम्ही संघटनात्मक पद्धतीने महायुतीला बरोबर घेऊन पुढे जाणार आहोत. या निवडणुकीचा विजय मोठा कसा राहील? यासाठी आम्ही योजना तयार केली आहे.