श्रीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज १८ ऑगस्ट रोजी जम्मूमध्ये विधानसभा निवडणूकीबाबत भाजपची बैठक झाली. यावेळी जम्मू-काश्मीरचे माजी मंत्री चौधरी जुल्फकार अली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
केंद्रीय मंत्री आणि जम्मू-काश्मीर भाजपचे विधानसभा निवडणूक प्रभारी किशन रेड्डी, राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हेही या बैठकीला उपस्थित होते.
जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना म्हणाले की, जम्मूमध्ये पक्ष एकट्याने निवडणूक लढवणार आहे. काश्मीरमध्ये अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊ शकतो. कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही.