नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा हरियाणात नरमली असल्याचे चित्र आहे. कारण अवघ्या दहा आमदार असणाऱ्या जननायक जनता पार्टीला भाजपने ११ खाती दिली आहे. सध्या हरियाणात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात ५६ जागा असणाऱ्या शिवसेना आणि सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजप यांचे मुख्यमंत्रीपदावरुन बिनसले आहे. पण हीच भाजपा हरियाणात दबावात असल्याचे चित्र आहे. कारण, १० आमदार असलेल्या पक्षाला हरियाणातील भाजपने ११ महत्त्वाची खाती दिली आहेत. मनोहर लाल खट्टर यांच्या कॅबिनेटच्या विस्ताराच्या एक दिवस अगोदरच खातेवाटप करण्यात आले. यावेळी जेजेपीला भाजपने तब्बल ११ विभाग दिले आहेत. केवळ १० जागा असणाऱ्या जेजेपीचे दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री आहेत. याशिवाय ११ विभागही जेजेपीला मिळाले.