Home राजकीय भाजप समर्थक ट्रम्पच्या पाठीराख्यांप्रमाणे दंगा करतील – ममता

भाजप समर्थक ट्रम्पच्या पाठीराख्यांप्रमाणे दंगा करतील – ममता

0
23

कोलकाता । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपा आता भंगार पक्ष बनला आहे. ज्यादिवशी भाजपा निवडणुकीत पराभूत होईल, त्यादिवशी भाजपाचे समर्थक ट्रम्पच्या पाठीराख्यांप्रमाणे वर्तन करून दंगा करतील, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

एका सभेला संबोधित करताना तृणमूलमधून भाजपामध्ये होणाऱ्या पक्षांतराबाबत प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, अनेक लोक केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने भाजपामध्ये जात आहेत. अनेक लोकांनी पैसे कमावले होते. आता त्यांना भाजपा घाबरवून, धमकाबून आपल्याकडे खेचत आहे. भाजपा आता भंगार पक्ष बनला आहे. तो दुसऱ्या पक्षातील बेकार लोकांना आपल्या पक्षात घेत आहे. 

बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, भाजपाचे नेते निवडणुकीपूर्वी सर्वांना नोकऱ्या देऊ, सर्वांना नागरिकत्व देऊ असे सांगतात. मात्र निवडणुकीनंतर डुगडुगी वाजवून पसार होतात. मी बंगालमध्ये एनसीआर लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

 


Protected Content

Play sound