Home धर्म-समाज छत्रपती घराण्याचा अपमान भाजपने करू नये- खा. राऊत

छत्रपती घराण्याचा अपमान भाजपने करू नये- खा. राऊत

0
26

कोल्हापूर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | शाहू महाराज छत्रपती घराण्याचा वारसा चालवत असून ते जेष्ठ आहेत, आणि चुकीच्या माहितीच्या आधारे ते कधीही बोलणार नाहीत. त्यामुळे भाजपने छत्रपती घराण्याचा अपमान करू नये,’ अशी टीका खा. संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली.

संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द मोडल्याचा आरोप केल्यानंतर शाहू छत्रपती यांनी हा आरोप चुकीचा आहे असे म्हटले होते. यावर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही किडक्या डोक्याच्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट दिली, असल्याचा आरोप महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. याला प्रत्युत्तर राऊत यांनी दिले आहे.

राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असताना, शाहू महाराज यांनी काल गौप्यस्फोट केल्यानंतर खा.संजय राऊत यांनी कोल्हापूर येथे आज संजय राऊत यांनी शाहू महाराजांची भेट घेतली. खा.संजय राऊत हे कोल्हापूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून शाहू महाराजांची भेट राजकीय नसून, छत्रपती घराण्याचे वंशजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही काम करतो. महाराजांची भेट घेऊन या, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे मी त्यांची भेट घेत असल्याचे खा. राऊत यांनी म्हटले आहे.


Protected Content

Play sound