नागपूर वृत्तसंस्था । नागपूर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना बघायला मिळाला. भाजप-सेनेच्या आमदारांमध्ये भर सभागृहातच हाणामारी झाल्याने वातावरण आणखी चिघळले. यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचा शेतकऱ्यांचा कळवळा हा खोटा आहे. भाजपने उगाच इथे बोंबलू नये, केंद्राकडे जाऊन पैसे मागावे, असे त्यांनी भाजपला सुनावले.
आज हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. नंतर अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या दालनात बैठक बोलावली आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांची बोलतांना म्हणाले की, हे या सरकारचे पहिले अधिवेशन आहे. सभागृहचं कामकाज जग बघतं. माझी दोन्ही पक्षांना विनंती सभागृहाच्या इतिहासाला काळिमा फसू नका.
फक्त विरोधी पक्ष आहे सत्तारूढ पक्षला काही देणं घेणं नाही हे चित्र उभे करण्याचा प्रयत्न होतोय. शेतकऱ्यांना वचन दिलंय ते आम्ही पाळणार. फक्त बोंबल्ल्याने प्रश्न मार्गी लागत नाहीत असंही त्यांनी सुनावलं. आम्ही सामना वाचत नाही म्हणाऱ्यांना सामना हातात घेण्याची वेळ आलीय. आधी सामना वाचला असता तर विरोधात बसले नसते. चोरून सामना वाचण्यापेक्षा उघडपणे सामना वाचला असता तर आज सामना करायची गरज नसती. पूरग्रस्तांसाठी 7 हजार आणि अवकाळी पावसासाठी 7 हजार कोटी केंद्राकडे मागितले आहेत.