एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एरंडोल नगरपरिषद निवडणुकीचा ताप वाढत असताना भाजप-सेना युतीने गुरुवारी शहरात भव्य शक्तीप्रदर्शन करत निवडणूक प्रचाराला वेग दिला. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीत कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. प्रभाग क्र. ९ व १० मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित ही रॅली शहरभरातून भव्य उपस्थितीत पार पडली.
या प्रचार रॅलीत एरंडोल-पारोळा तालुक्याचे कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे आमदार अमोलदादा चिमणराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. रॅलीदरम्यान प्रभाग क्र. ९ चे उमेदवार नितेश कैलाश चोधरी, जिजाबाई वसंत पाटील तसेच प्रभाग क्र. १० चे उमेदवार मनकरणाबाई चैत्राम चोधरी आणि नोएम खॉं दलशेरखॉ यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

रॅलीसोबतच प्रभाग क्र. ११ आणि प्रभाग क्र. ७ मधील प्रचार कार्यालयांचे विधिवत उद्घाटनही आमदारांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यांनाही मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी हजेरी लावून आपला पाठिंबा दर्शविला.
कार्यक्रमात भाजपाचे ज्येष्ठ नेते किशोरभाऊ काळकर, रमेशभैय्या परदेशी, रवींद्र महाजन, मनोजभैय्या पाटील, अशोक चोधरी, संजू साळी, आर्शिवाद पाटील, राजुआबा चोधरी, बबलू भाऊ चोधरी, किशोर चोधरी, प्रकाश ठाकूर, चंदू जोहरी, गुड्डू जोहरी, दशरथ चोधरी, सुनील चोधरी, मालती अमोल वाणी, संजय सुरेश पाटील, मंजुळाबाई नत्थू चोधरी, धनंजय खैरनार, अतुल मराठे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
रॅलीदरम्यान शहरातील मुख्य मार्गांवर ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत युतीचा दमदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. आगामी निवडणुकीत विकास, सुशासन आणि पारदर्शकतेच्या आधारावर मतदारांचा विश्वास संपादन करू, असा विश्वास युतीच्या नेतृत्वाने व्यक्त केला.



