मुंबई, वृत्तसंस्था | राज्यात बिगर भाजपा सरकार बनविण्याचा प्रयत्न सुरू झालेला असतानाच या प्रयत्नांना भाजपकडून खो घातला जात आहे. असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (दि.१३) येथे केला.
ते पुढे म्हणाले की, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊ नयेत म्हणून भाजपने प्रयत्न सुरू केला आहे, असेही एका वृत्तवाहिनीशी बोलताना चव्हाण यांनी म्हटले आहे.