Home Cities जळगाव माजी खा.उन्मेष पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन; जाहीर माफीची मागणी !

माजी खा.उन्मेष पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन; जाहीर माफीची मागणी !


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार स्मिताताई वाघ यांच्यावर बेछूट वक्तव्य करून गंभीर आरोप केल्याप्रकरणी माजी खासदार उन्मेष पाटील यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त राजकीय प्रत्युत्तर दिले आहे.

माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देताना भाजप कार्यकर्ते म्हणाले की, स्मिताताई वाघ या भाजपच्या अनुभवी आणि जुन्या कार्यकर्त्या आहेत, ज्यांना संघटनात्मक कामाचा दीर्घ अनुभव आहे.

माजी खासदारांनी महिला लोकप्रतिनिधीबद्दल अशी भाषा वापरणे हे त्यांच्या राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे. कार्यकर्त्यांनी म्हटले की, “तुम्ही स्वतः अपघाती खासदार कसे झालात हे सर्व जनतेला माहीत आहे,” त्यामुळे इतरांवर टीका करण्याआधी त्यांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करावा. भाजपने आता केवळ निषेधावर न थांबता, उन्मेष पाटील यांनी जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा आणि गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनात अमेय राणे, भूषण भोळे, मुविकोराज कोल्हे, राहुल पाटील, संजय भोळे, किशोर चौधरी, सचिन साळुंखे, संजय चौधरी यांचा सहभाग होता.


Protected Content

Play sound