पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा मतदार संघात सुरू असलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन पाचोरा शहरातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना उपनेते तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक तथा पाचोरा शहर भाजपाचे उपाध्यक्ष देवराम लोणारी, भाजपा मच्छीमार सोसायटी अध्यक्ष युवराज भोई, भाजपा ओ. बी. सी. सेल अध्यक्ष अजय सोनार, भा.ज.पा. उपाध्यक्ष पाचोरा शहर रघुनाथ कुमावत आदी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार किशोर पाटील, संपर्क प्रमुख सुनिल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे , नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपजिल्हाप्रमुख अॅड. दिनकर देवरे, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख बंडू चौधरी आदी शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.