Home Cities पारोळा भाजप ओबीसी जिल्हा मोर्चा उपाध्यक्षपदी जितेंद्र चौधरी

भाजप ओबीसी जिल्हा मोर्चा उपाध्यक्षपदी जितेंद्र चौधरी


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील रहिवासी तथा नानासो ए. टी. पाटील माध्यमिक विद्यालय मुंदाणे येथील उपशिक्षक जितेंद्र आनंदा चौधरी यांची भाजपा ओबीसी जिल्हा मोर्चा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. नियुक्तीपत्रात जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळके महाराज यांनी म्हटले आहे की, यापूर्वी आपण पक्षासाठी केलेले कार्य, योगदान पाहता आपली भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी जिल्हा मोर्चा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे.

गतकाळात पक्षाचे केलेले कार्यापेक्षा अधिक कार्य व योगदान आपण यावेळी द्याल असा विश्वास आम्हाला आहे. यापूर्वी जितेंद्र चौधरी यांनी भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाअध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेली होती. या नियुक्तीचे नामदार गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, खासदार स्मिता वाघ, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, माजी खासदार ए. टी. पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण आदींनी कौतुकासह अभिनंदन केले आहे. दरम्यान पक्ष आदेशान्वये पक्ष संघटन वाढीसाठी सर्वतो प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया या नियुक्तीच्या अनुषंगाने ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र चौधरी यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound