मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्या शिडीने वर आले आता तीच शिडी सोडायला तयार आहेत. मी मोहन भागवतांना विचारले होते की, मागच्या दोन वर्षात मोदींनी भेटायला वेळ दिली का? याचे उत्तर मला अजूनही आलेलं नाही. जे पी नड्डा यांच्या वक्तव्यावरून सर्व दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला आता आरएसएस नकोय असे वक्तव्य बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
जे पी नड्डा यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यात त्यांना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून ते आतापर्यंत आरएसएसची उपस्थिती कशी बदलली? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर जे पी नड्डा म्हणाले की, सुरुवातीला आम्ही अक्षम असू, थोडे कमी असू. आरएसएसची गरज लागायची. पण आज सक्षम आहोत. त्यामुळे भाजप पक्ष आम्ही आमचा चालवतो, असे त्यांनी म्हटले. यावरून राजकारण तापले आहे.