यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगांव बु. येथील श्रीराम मंदिरात गुजरातचे माजी मंत्री विनोद मोरडीयांच्या उपस्थितीत शक्तीकेंद्र प्रमुख / बुथप्रमुख यांची बैठक संपन्न झाली.
यावेळी भगवान वना कुंभार यांची बुथ अध्यक्ष म्हणून ( बुथ क्र १७८ साठी) नियुक्ती केली एवढच नव्हे तर गुजरात राज्यांचे माजी मंत्री व भाजपा संघटन प्रमुख माजी मंत्री विनोद मोरडीयां यांच्या उपस्थितीत भगवान वना कुंभार याचा भाजपा पक्ष प्रवेश सोहळा देखील संपन्न झाला. त्यांच्या या निर्णयाचे उजैन्नसिंग राजपुत, विलास चौधरी, गोविंद चौधरी विधानसभा क्षेत्रप्रमुख नरेंद्र सभापती माजी शिक्षण समिती जीप जळगाव, नागेश्वर साळवे, दिपक पाटील माजी पं. स. सदस्य यावल यांचे सह सर्व उपस्थित मान्यवर मंडळीनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद सैदाने यांनी केले योजनाची माहिती जिल्हl परिषदचे माजी सदस्य रविन्द्र उर्फ छोटू पाटील यांनी दिली अध्यक्षीय भाषणात अनमोल मार्गदर्शन गुजरात चे माजी मंत्री विनोद मोरडीयांनी केल बुथ प्रमुखा चे मुख्य कार्य काय याबाबत मार्गदर्शन नायगांव शक्तीकेंद्र प्रमुख अरुण पाटील यांनी केले व कार्यक्रमा चे आभार विलास चौधरी यांनी मानले .