यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख,सर्व पदाधिकारी यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक सुरतचे आमदार व माजी मंत्री विनोद मोरडीया यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ, यावल च्या सभागृहात महाराष्ट्र राज्यात होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आयोजीत करण्यात आलेल्या अत्यंत महत्वाच्या बैठकीत सुरतचे विद्यमान आमदार व गुजरात राज्याचे माजी मंत्री विनोद मोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. कुंदन फेगडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी व उज्जैनसिंग राजपुत, भाजपा जेष्ठ सदस्य किशोर कुलकर्णी, श्रीकांत महाजन, युवा मोर्चाचे रितेष बारी,सुधाकर फेगडे,पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान डॉ. कुंदन फेगडे यांनी यावेळी आमदार विनोद मोरडीया यांचे स्वागत केले. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मोरडीया यांनी ही रावेर विधानसभा मतदार संघातील यावल शहरात घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.