चंदीगढ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. ९० पैकी ४९ जागांवर भाजपने निर्णायक आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ३५ जागांवर तर अपक्ष ३ जागांवर आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डांचाही विजय झाला आहे. तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हे देखील लाडवा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
एक्झिट पोलच्या सर्व अंदाजांच्या अगदी विरुद्ध हा निकाल आहे. अशा तऱ्हेने भाजपने आपली जुनी युक्ती आजमावून हरियाणा निवडणुकीचा डाव फिरवला आहे. हरियाणा इतिहास रचताना भाजपने विजयाची हॅटट्रिक केली आहे. यापूर्वी राज्यात सलग तीन निवडणुका कोणत्याही राजकीय पक्षाला जिंकता आल्या नव्हत्या. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार भाजपचे ४० उमेदवार विजयी झाले आहे. तर ८ आघाडीवर आहे. त्यामुळे राज्यात भाजपने सर्व पक्षांना मागे करत यावेळी स्वबळावर सत्ता प्राप्त केली आहे.