जळगाव जिल्ह्यात भाजपचे कमळ फुलले; महायुतीचे दोनही उमेदवार मोठ्या लीडने विजयी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडी आणि महायुतीत मोठी लढत झाली आहे. या निवडणूकीत जळगाव लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार स्मिताताई वाघ ह्या विजयी झाल्या तर रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षाताई खडसे या विजयी झाले आहे.

पहिल्या फेरीपासून महायुतीचे दोनही उमेदवार हे आघाडीवर होते. लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरू असतांना विरोधात असलेलेल महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा आरोप करत मतमोजणी थांबविण्यात आली होती. परंतू त्यानंतर सर्व गोष्टी क्लिअर केल्यानंतर मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पहिल्या फेरीपासून रक्षा खडसे या आघाडीवर होत्या. त्यामुळे दुपारीच त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाली आणि विजयी घोषीत करण्यात आला. रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षा खडसे यांना ६ लाख २७ हजार ६७२ मते मिळून २ लाख ७१ हजार ४८ मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांना ३ लाख ५६ हजार ६२४ मते मिळाली आहे. तर दुसरीकडे जळगाव लोकसभेतून विजयी झाले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारी नुसार जळगाव लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार स्मिताताई वाघ यांचा ६ लाख ५३ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. स्मिताताई वाघ हे २ लाख ४३ हजार ७५५ मतांनी आघाडीवर असून प्रतिस्पर्धी करण पवार यांना ४ लाख ९ हजार ७७५ मते मिळाली आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांचा विजय निश्चित होत असल्याचे चिन्हे दिसू लागताच शहरातील जी.एम.फाऊंडेशनच्या भाजपा संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केल्याचे पहायला मिळाले. जळगाव लोकसभेतून महायुतीचे दोनही विजयी उमेदवार विजयी झाल्याने जळगाव शहरातील जी.एम.फाऊंडेशनच्या भाजपा कार्यालयात मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आ. राजूमामा भोळे, माजी खासदार ए.टी.नाना पाटील, उमेदवार स्मिताताई वाघ, उमेदवार रक्षा ताई खडसे यांनी कार्यकर्त्यांसोबत फटाके फोडून एकच जल्लोष केल्याचे पहायला मिळाले.

दुसरीकडे विधान परिषदेचे आमदार राहिलेल्या स्मिताताई वाघ यांना गेल्या लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी मिळाली. परंतू ऐनवेळी त्यांचे उमेदवारीचे तिकीट कापले गेले आणि जळगाव लोकसभेतून उन्मेश पाटील हे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षासाठी काम केले. लोकसभा निवडणूकीत त्यांच्या कामाची पावती महणून लोकसभा निवडणूक -२०२४ मध्ये मात्र स्मिताताई वाघ यांना महायुतीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली,.

माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षाताई खडसे यांना भाजपाकडून तिसऱ्यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली आहे. त्यात गेल्या दहा वर्षात त्यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि मतदार संघात केलेल्या कामामुळे त्यांची जनतेशी नाळू जळून होती. त्यांनी तिसऱ्या उमेदवारी मिळेल की नाही यावर शंका निर्माण झाली होती. परंतू महायुतीच्या माध्यमातून त्यांना तिसऱ्यांना उमेदवार मिळाली आणि आता तिसऱ्यांदा देखील त्या मोठ्या फरकाने निवडून आल्या आहे.

Protected Content