Home राजकीय अमेठीत भाजपा पैसे वाटतेय ; प्रियांका गांधींचा आरोप

अमेठीत भाजपा पैसे वाटतेय ; प्रियांका गांधींचा आरोप


priyanka gandhi
 

अमेठी (वृत्तसंस्था) भाजपवाले काँग्रेसच्या विरोधात केवळ चुकीचा प्रचारच करत नसून ते गावच्या प्रमुखांना पैशांची पाकिटेही पाठवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे.

 

गांधी कुटुंबासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या मतदारसंघात प्रियांका गांधी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. भाजपच्या प्रचाराला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर अमेठीतून भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना पुन्हा आव्हान दिले आहे. गांधी घराण्याचा हा बालेकिल्ला जिंकायचाच या निश्चयाने भाजपने इथे प्रचार सुरू केला आहे. अमेठीत आज झालेल्या सभेत प्रियांकांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘अमेठीत अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रचार सुरू आहे. पैसे वाटप होत आहे. अमेठीतील गावकऱ्यांना मी काँग्रेसचा जाहीरनामा लिफाफ्यातून पाठवतेय. तर, भाजपवाले २० हजार रुपये पाठवताहेत, असा आरोप प्रियांका यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound