Home राजकीय काँग्रेसचे बटन दाबल्यावर मत भाजपाला जातेय ; सुशीलकुमार शिंदेंचीही तक्रार

काँग्रेसचे बटन दाबल्यावर मत भाजपाला जातेय ; सुशीलकुमार शिंदेंचीही तक्रार


sushilkumar shinde
 

सोलापूर (वृत्तसंस्था) सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान यंत्रांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात यांनी केल्यानंतर आता कांग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनीही काँग्रेसला मतदान केल्यास भाजपाला जात असल्याची तक्रार केली आहे.

 

सकाळी मतदान सुरु झाल्यापासून अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाले आहेत. तसेच काँग्रेसला मतदान केल्यास भाजपला जात असल्याचा आरोपही माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून मतदान करण्याची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, १४९ व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आले असून आक्षेप घेतलेली यंत्रे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांने देखील कपबशीचे बटन दाबल्यास कमळाची लाईट लागत असल्याचा आरोप सकाळी केला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound