Home Cities यावल भाजपने यावल तालुक्यात तिघा युवकांवर टाकली मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी

भाजपने यावल तालुक्यात तिघा युवकांवर टाकली मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी


यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने यावल तालुक्यात महत्त्वपूर्ण संघटनात्मक पाऊल उचलले आहे. तालुक्यातील तीन वेगवेगळ्या मंडळांसाठी प्रथमच तिघा तरुण नेत्यांची एकाच वेळी मंडळाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, नव्या नेतृत्वाबाबत मोठ्या प्रमाणावर उत्साहाचे वातावरण आहे.

यावल सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तीन प्रमुख मंडळाध्यक्षांची घोषणा करण्यात आली:

किंगाव साकळी मंडळाचे अध्यक्ष म्हणून अनिल रामराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

यावल मंडळाचे अध्यक्ष म्हणून सागर कोळी यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला.

फैजपूर तालुका यावल मंडळाचे अध्यक्ष म्हणून उमेश बेंडाळे यांची निवड झाली.

या नियुक्त्यांमुळे तालुक्यात भाजपच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ मिळेल आणि युवा नेतृत्वाला संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणा निर्माण होईल, असे मत उपस्थित नेत्यांनी यावेळी व्यक्त केले.

या बैठकीला भाजपाचे जळगाव जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष शरद महाजन, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे राकेश फेगडे, भाजप यावल तालुका अध्यक्ष उमेश फेंगडे, तसेच भरत महाजन, भरत पाटील, उज्जैनसिंग राजपूत, हर्षल पाटील, नारायण चौधरी, नागेश्वर साळवे, मुकेश कोळी, योगेश चौधरी, हेमराज फेगडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, नव्या अध्यक्षांचे अभिनंदन केले जात आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे भाजपची संघटनात्मक ताकद वाढेल आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Protected Content

Play sound