Home Cities यावल भाजप यावल शहराध्यक्षपदी राहुल बारी यांची निवड

भाजप यावल शहराध्यक्षपदी राहुल बारी यांची निवड


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्ते यांची भारतीय जनता पक्षाच्या यावल शहराध्यक्षपदी राहुल पंढरीनाथ बारी यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा पुर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या आदेशावरून भारतीय जनता पक्षाचे तालूकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी निवड पत्र देऊन यावल शहरातील भारतीय जनता पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते राहुल पंढरीनाथ बारी यांची यावल शहराध्यक्षपदी निवड केली आहे.

राहुल बारी यांच्या निवडीचे रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राकेश फेगडे, तालूकाध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील, भाजपा युवा मोर्चाचे सोशल मिडीया जिल्हा सहसंयोजक व कार्यकर्ते-पदाधिकारी आदीनी स्वागत केले आहे .


Protected Content

Play sound