Home प्रशासन सावदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन सुविधा सुरू करा; भाजपची मागणी

सावदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन सुविधा सुरू करा; भाजपची मागणी


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भाजपकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन सांगळे यांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की, सावदा ता. रावेर येथील राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा असून नियमित बाह्य रुग्ण तपासणी सुरू आहे. परंतु मृत्यू झालेल्या रुग्णांचे शवविच्छेदन करण्यासाठी काही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना आणि पोलिसांना लांब अंतरावर इतर रुग्णालयात जावे लागते.

निवेदनात असेही म्हटले आहे की, आधी नगरपरिषदेच्या काळात या रुग्णालयात शवविच्छेदन सुविधा उपलब्ध होती, तसेच आताही रुग्णालयात शवविच्छेदन गृह आणि डॉक्टर आहेत, परंतु सुविधा वापरात नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढत असून, लवकरात लवकर ही सुविधा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी भाजपा सावदा मंडळाचे अध्यक्ष दुर्गादास पाटील, सरचिटणीस महेश अकोले यांच्या स्वाक्षऱ्या असून जगदीश पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound