Home राजकीय मोदींसमोर आत्महत्या करण्याची भाजप उमेदवाराची धमकी

मोदींसमोर आत्महत्या करण्याची भाजप उमेदवाराची धमकी


sanbor
 

शिलाँग (वृत्तसंस्था) घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक लागू करण्याचे आश्वासन देत भाजप लोकसभा निवडणूक लढवत आहे, तर दुसरीकडे याच विधेयकाला भाजपच्या एका उमेदवाराने विरोध दर्शवला आहे. हे विधेयक लागू केले तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोरच आत्महत्या करेन, असा इशारा मेघालयातील शिलाँग लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सनबोर शुल्लाई यांनी दिला आहे.

 

घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक लागू करणार असल्याचे आश्वासन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी दिले होते. त्यावर भाजप उमेदवार सनबोर शुल्लाई यांनी गुरुवारीच नागरिकत्व (सुधारणा) विधेयकाला विरोध केला. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत या विधेयकाला विरोध असेल. त्यासाठी मी जीव सुद्धा देईल. नरेंद्र मोदींच्या समोरच आत्महत्या करेन, असे शुल्लाई म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound