शेंदुर्णी ता. जामनेर (प्रतिनिधी)। कोरोना प्रादुर्भावानंतर सर्व मंदीरे बंद ठेवण्यात आली होती. मंदीरे खुली करण्यासाठी भाजपातर्फे शेंदुर्णी येथे ग्रामदैवत श्री त्रिविक्रम मंदीरासमोर आंदोलन करण्यात आले.
शहरातील ग्रामदैवत श्री त्रिविक्रम मंदीरासमोर भाजपाचे उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. २३ मार्च पासून देशात मंदीरे बंद ठेवण्यात आले आहे. सर्व मंदीरे उघडून दैनंदिन दर्शनासाठी खुली करावी अश्या मागणीसाठी आज जिल्ह्यात ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान, मंदीरे न उघडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी भाजपातर्फे ठाकरे सरकारला देण्यात आला. यावेळी तालुकाउपाध्यक्ष सुनिल शिनकर, राजेंद्र भारूडे, शंकरी बारी, विजय धुमाळे, हभप कडुबा माळी, हभप रामेश्वर महाजन, नगरसेवक सतीश बारी, शरद बारी व महिला उपस्थित होत्या.