जळगाव प्रतिनिधी । मंदीरे सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपातर्फे आध्यात्मिक समन्वयक आघाडीतर्फे राज्यभरात आंदोलन करण्यात आले. आज गोलाणी मार्केटमधील हनुमान मंदीरासमोर आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत घंटानाद आंदोलन करण्यात आले.
ठाकरे सरकारला इशारा देण्यासाठी आज जिल्ह्यात ठिकठिकाणी घंटानाद करण्यात येत आहे. शहरातील मंदीरे उघडे करा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे गोलाणी मार्केट जवळील हनुमान मंदिर येथे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, महापौर भारती सोनवणे, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर ललित कोल्हे, नगरसेवक भगत बालाणी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/310086586870476/