पाचोऱ्यात भाजपचे खड्ड्यांविरोधात आंदोलन ; शिवसेनाला घराचा आहेर (व्हीडीओ)

dd892e4c 455e 491c a25b b96618b2f1c9

 

पाचोरा (प्रतिनिधी) मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे आमदार किशोरअप्पा पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांच्यात नगरपालिकेच्या कामांवरून कलगीतुरा रंगलेला आहे. परंतू आज पाचोरा भाजपने शहरातील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करून एकप्रकारे शिवसेनाला घराचा आहेर दिला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, पाचोरा शहरातील विविध कॉलनी व रहिवाशी भागातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांना व शालेय विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असून त्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने बऱ्याचवेळा वाहने जोरात खड्ड्यात आदळतात. काही रस्त्यावर वाहनं फसत असून वाहन चालवताना लहानमोठ्या अपघातीना सामोरे जावे लागत आहे. भारत डेअरी स्टॉप ते शिवाजी चौक, गिरड रस्ता हा बाजारपेठेतील हा महत्त्वाचा रस्ता असल्याने तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची आवश्यकता आहे. मात्र, नगरपालिका नावालाच डागडुजी करत असल्यामुळे अपघाताच्या घटना वाढत आहेत.

 

आज नगरसेवक अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कृष्णापुरी ते नगर पालिका पर्यंत आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात जि.प. सदस्य मधुकर काटे, सभापती बन्सीलाल पाटील, माजी सभापती सुभाष पाटील, कृउबा समितीचे सभापती सतीश शिंदे, डॉ.अस्मिता पाटील, गोविंद शेलार, प्रदीप पाटील, हेमंत चव्हाण, नगरसेवक रफिक बागवान, लतीफ मिस्त्री, नंदू सोमवंशी, पिंटू चौधरी, विनोद देवरे, रेखाताई पाटील यांच्यासह सर्व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, केंद्र व राज्यात युती घट्ट असतांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने केलेल्या आंदोलनामुळे शिवसेना पर्यायी आमदार किशोरअप्प्पा पाटील अडचणीत सापडले आहेत.

 

Protected Content