मुंबई (प्रतिनिधी) शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाचा फॉर्मूला ठरल्याचे वृत्त समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा 25, तर शिवसेना 23 जागा लढवणार असून विधानसभा निवडणुकीत भाजपा 145, तर शिवसेना 143 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यानिमित्ताने लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाच मोठा भाऊ असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना लढले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मिशन 151ची घोषणा केल्याने दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले होते. त्यावरुन युती तुटली होती. मात्र आता पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपाची युती होणार असल्याचे कळते.