जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मायाताई धुप्पड यांच्या कविता मुलांच्या मनात अक्षय रुंजी घालणाऱ्या आहेत.” सुप्रसिद्ध बाल साहित्यिका मायाताई धुप्पड यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे प्रेरक संस्थापक आधारस्तंभ सुप्रसिद्ध साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते निवासस्थानी शाल व फुलांचा सुशोभित गुलदस्ता देऊन सत्कार करीत अभिष्टचिंतन करण्यात आले.
या प्रसंगी निवृत्त शिक्षण उपसंचालक असणारे प्रख्यात साहित्यिक हिंगोणेकर यांनी नतमस्तक होऊन धुप्पड मॅडम यांचे शुभाशिर्वाद घेतले. विद्वता व पदाचा अभिनिवेश न आणता ” विद्या विनयेन शोभते ” याचा दुर्मिळ प्रत्यय हिंगोणेकर यांच्या सुसंस्कृत वर्तनातून आला ! १० वर्षापूर्वी धुप्पड मॅडम यांच्या हस्ते माझा सन्मान झालाय याचाही त्यांनी अभिमानपूर्वक उल्लेख केला.अनपेक्षित भावसत्काराने धुप्पड मॅडम भारावल्या.
यावेळी हिंगोणेकरांनी धर्मपत्नी उषा हिंगोणेकर लिखित ” धगधगते तळघर ” कवितासंग्रह (श्रीस्थानक राज्य पुरस्कार प्राप्त ) सादर भेट दिला . मायाताई धुप्पड यांच्या लेखन कतृत्वावर गौरवपूर्ण बोलतांना हिंगोणकर पुढे म्हणाले की,” मराठी बालसाहित्यात मुलांचे मानसशास्र जाणून मुलांच्या मनातले भावनांचे विश्व साकारणारे जे मराठीतले मोजके सृजनशील बालसाहित्यिक आहेत त्या मांदियाळीतील सौ.मायाताईंचे लेखन अव्वल दर्जाचे आहे.साठीनंतरही अजूनही मॅडम निरंतर दर्जेदार लेखन करीत आहेत ही अभिमानास्पद व अभिनंदनीय बाब आहे.” धुप्पड मॅडम यांनी कविश्रेष्ठ हिंगोणेकर यांना स्वलिखित १५ पुरस्कृत बालकविता संग्रहाचा नजराणा देऊन विशेष हृद्य सत्कार केला.
तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या सहकार्याने आयोजित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सन्माननीय निवड झाल्या प्रित्यर्थ मायाताई धुप्पड यांचा हृद्य सत्कार भारतरत्न डॉ. एपीजे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी ,जळगावचे संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी शाल व बुके देऊन हृद्य सत्कार केला.गुणग्राही धुप्पड मॅडम यांनी विश्वविक्रमी कलावंत सुनिल दाभाडे यांनी बाबासाहेबांच्या जयंतीदिनी ११११ शब्दान्वये विश्वभुषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा साकारून अनोखी कलात्मक मानवंदना दिल्या प्रित्यर्थ दाभाडेंचा गौरव केला.याप्रसंगी मायाताईंचे यजमान डॉ.दिलीप धुप्पड उपस्थित होते .