कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वार जखमी

265462

जळगाव (प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील चिनावल गावाजवळ कामावर जात असताना दुचाकीसमोर कुत्रे आडवे आल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. जखमीस मित्राच्या मदतीने खाजगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

.
मिळालेली माहिती अशी की, अक्षय गणेश वाघोदे (वय ३१) रा. वडगाव, तालुका रावेर हा हळद उकळण्याचे काम करतो, चिनावल येथे कामावर जाण्यासाठी तो आज सकाळी दुचाकीने वडगावकडून चिनावल येथे जाण्यासाठी निघाला असता चिनावल गावाजवळ ८.३० वाजेच्या सुमारास अचानक कुत्रे आडवे आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून जखमी झाला. या अपघातात अक्षयला डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून त्याला प्राथमिक उपचारासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल नेण्यात आले तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयातही त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येवून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content