भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी !

0
126

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ असलेल्या हॉटेल सावन समोर दुचाकीने जात असलेल्या तरूणाला समोरून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक देवून गंभीर दुखापत केल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती अखेर बुधवारी १० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख शरजील अहेमद युनुस मनियार रा. अक्सा नगर, जळगाव हा तरूण १२ नोव्हेंबर रोजी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीडी ३०६७) ने नशिराबाद गावाच्या पुढे हॉटेल सावन जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक (एमएच १९ बीक्यू २४९०) ने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार शेख शरजील अहेमद युनुस हा गंभीर जखमी झाला तसेच त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. याप्रकरणी जखमी शेख शरजील याचा भाऊ शाहिद अहमद शेख युनूस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख हे करीत आहे.